Lok Sabha Election 2024 : कंगना रणौत ने नमो चहाच्या स्टॉलवर भाजप कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत अलीकडेच अभिनय क्षेत्र बाजूला सारून राजकारणात उतरली आहे. भाजपने कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून लोकसभेचे तिकीट दिले आहे. तेव्हापासून कंगना ही तिच्या मतदार संघात चांगलीच ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच, कंगनाने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत, ज्यात ती नमो चहाच्या स्टॉलवर भाजप कार्यकर्त्यांसोबत दिसत आहे.
Lok Sabha Election 2024 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) एका राजकारणीच्या रुपात समोर येत आहे. कंगनाने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती नमो चहाच्या स्टॉलवर भाजप (BJP) कार्यकर्त्यांना आणि काही लोकांना चहा वाटताना दिसत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नमो चहाच्या स्टॉलवर सहकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना ताजेतवाने वाटते'. (हेही वाचा:Madgaon Express Box Office Collection: 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई; पहिल्या आठवड्यात जमावला 13 कोटींहून अधिकचा गल्ला)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2024 11:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

