Landslide in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये भूस्खलन; चीन सीमेला जोडणारा महामार्ग गेला वाहून

गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी गुरुवारी अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याची घटनी घडली.

Landslide in Arunachal Pradesh : चीनच्या सीमेला जोडणाऱ्या रोईंग अनिनी महामार्ग (Roing Anini highway) चा काही भाग भूस्खलनात वाहून गेला आहे. हा महामार्ग दिभांग व्हॅलीला उर्वरित भारताशी जोडतो. भूस्खलन झाल्यामुळे हुनली आणि अनिनी दरम्यान रोईंग अनिनी महामार्गालगतच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) चे मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे."हुणली आणि अनिनी दरम्यानच्या महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय जाणून अस्वस्थ आहोत. हा रस्ता दिबांग खोऱ्याला देशाच्या इतर भागाशी जोडणारा असल्याने लवकरात लवकर संपर्क पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती देणारे ट्विट त्यांनी केले. (हेही वाचा : )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now