Kalicharan Maharaj Arrested: कालीचरण महाराजांना रायपूर पोलिसांकडून अटक, धर्म संसदमध्ये महात्मा गांधींचा अवमान केल्याप्रकरणी घेतलं ताब्यात

छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून ताब्यात घेतलं आहे.

Kalicharan Maharaj Arrested: कालीचरण महाराजांना रायपूर पोलिसांकडून अटक, धर्म संसदमध्ये महात्मा गांधींचा अवमान केल्याप्रकरणी घेतलं ताब्यात
Kalicharan Maharaj (Photo Credits: IANS)

छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून ताब्यात घेतलं आहे. त्यांना धर्म संसदमध्ये महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या प्रक्षोभक भाषणासाठी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध रायपूरच्या टिकरापारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कालीचरण महाराज मध्य प्रदेशातील खजुराहोपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ भाड्याच्या घरात राहत होते. आज पहाटे 4 वाजता रायपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपीसह रायपूरला पोहोचेल, असे एसपी रायपूर प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले. 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2021 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).