Fact Check: या महिन्याअखेरीस LIC आपली सर्व विमा उत्पादने आणि योजना मागे घेणार? सोशल मिडियावर बातमी व्हायरल, I&B Ministry ने दिले स्पष्टीकरण
बनावट नोटीसमध्ये दावा करण्यात आला आहे की, या सुधारणेमुळे प्रीमियम आणि पॉलिसीच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल होईल. मात्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, हा दावा खोटा आहे आणि अशी कोणतीही नोटीस विमा एजन्सीने जारी केलेली नाही.
Fact Check: गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मिडियावर एलआयसीबाबत एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, या महिन्याच्या अखेरीस सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यासाठी एलआयसी आपली सर्व विमा उत्पादने आणि योजना मागे घेणार आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. याबाबत केंद्राने एलआयसीला नोटीस पाठवल्याचा दावाही अहवालामध्ये करण्यात आला होता. मात्र आता ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आह्रे. एलआयसीने जारी केलेल्या कथित नोटीसबद्दलच्या अफवांचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खंडन केले आहे.
बनावट नोटीसमध्ये दावा करण्यात आला आहे की, या सुधारणेमुळे प्रीमियम आणि पॉलिसीच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल होईल. मात्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, हा दावा खोटा आहे आणि अशी कोणतीही नोटीस विमा एजन्सीने जारी केलेली नाही. (हेही वाचा: Free Aadhaar Update: आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी येत्या 14 सप्टेंबरपर्यंत मुदत; नंतर भरावे लागेल शुल्क, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)
एलआयसी नोटीसबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे स्पष्टीकरण-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)