Gazipur Fire: गाझीपूर येथील लॅंडसाईटला भीषण आग, धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास

गाझीपूर येथील लॅंडसाईटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सांयकाळी आग लागली होती. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Gazipur Fire News PC ANI

Gazipur Fire: दिल्लीतील गाझीपूर येथील लॅंडसाईटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सांयकाळी आग लागली होती. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.लॅडफिलमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसरले आहेत. धुरांमुळे परिसरातील नागरिकांना श्वशनाचा त्रास होत असल्याचे तक्रार केली आहे.  नागरिकांनी सांगितले की, आगीमुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रास वाढला आहे. वृध्दांवर यांचा गंभीर परिणार होऊ शकतो. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement