First Session Of 18th Lok Sabha: 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून ते 3 जुलैपर्यंत असणार; लोकसभा अध्यक्षांची होणार निवड

लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत आहे. 3 जुलैपर्यंत या अधिवेशनाचे कामकाज सुरू राहणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.

Lok Sabha | Twitter

First Session Of 18th Lok Sabha:  18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी ट्विट करत त्याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील. यासोबतच सभागृह अध्यक्षांची निवडही होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. 3 जुलैपर्यंत या अधिवेशनाचे कामकाज सुरू राहणार आहे. (हेही वाचा:Odisha New CM Mohan Charan Manjhi: मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, सोबत दोन उपमुख्यमंत्रीही असणार)

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now