Murder Caught On Camera In Gwalior: काँग्रेस समर्थक सरपंच विक्रम सिंह रावत यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, हत्याकांडाचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद, पहा
सोमवारी सकाळी ते वकील प्रशांत शर्मा यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी त्यांच्या कारमधून गांधीनगरला निघाले. ते नुकताच लोको रोडवर पोहोचले असता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
Murder Caught On Camera In Gwalior: ग्वालियर जिल्ह्यातील आळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी भरदिवसा एका काँग्रेस समर्थक सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जुन्या कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बनहेरी येथील सरपंच विक्रम रावत हे ग्वाल्हेरच्या कांती नगरमध्ये राहतात. सोमवारी सकाळी ते वकील प्रशांत शर्मा यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी त्यांच्या कारमधून गांधीनगरला निघाले. ते नुकताच लोको रोडवर पोहोचले असता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत विक्रम सिंह यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)