Boy Bitten By Pet Dog: खेळत असलेल्या ९ वर्षाच्या मुलावर सायबेरियन कुत्र्याचा हल्ला; हाताला गंभीर दुखापत

या घटनेत मुलगा गंभीर रित्या जखमी झाला आहे.

Dog | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Boy Bitten By Pet Dog: चेन्नईतील वेलाचेरी येथे गार्ड क्वार्टरमध्ये ही घटना घडली. या घटनेत उन्हाळी सुट्टी साजरी करण्यासाठी मावशीच्या घरी आलेल्या ९ वर्षाच्या मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. काल मंगळवारी संध्याकाळी खेळत असताना सायबेरियन (Siberian Dog)जमातीच्या पाळीव कुत्र्याने खेळत असलेल्या मुलाला चावा घेतला. यामध्ये मुलाच्या हाताला दुखापत (Severe hand injury) झाली आहे. घटनेनंतर मुलाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जखमी मुलावर तेथे उपचार करण्यात आले. या संदर्भात मुलाच्या पालकांनी पारंगीमलाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.(हेही वाचा:Dog Attack In Noida Housing Society Lift: नोएडा मध्ये रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video) )

दोनच दिवसांपूर्वी नुंगमबक्कम येथील उद्यानात एका मुलीला पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता, आता पुन्हा तोच प्रकार घडला आहे. त्याशिवाय, नोएडा मध्ये रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लिफ्ट एका मजल्यावर काही सेकंदांसाठी उघडते, लिफ्ट उघडताच कुत्र्याने मुलीवर उडी मारली आणि तिला चावा घेतला. त्यानंतर ती वेदनेने कळवळत हाताच्या दंडाकडे बघत होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)