Bomb Threat to Flights: ईमेलवर धमकीचे संदेश पोस्ट केल्याबद्दल दिल्लीतील एकाला अटक, 'लक्ष वेधण्यासाठी' कृत्य केल्याचा खुलासा (Watch Video)
दिल्ली आयजीआय विमानतळावर बॉम्बच्या धमक्या पाठवल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 'लक्ष वेधण्यासाठी' हे कृत्य केल्याचे आरोपीने म्हटले आहे.
Bomb Threat to Flights: दिल्ली आयजीआय विमानतळावर बॉम्बच्या धमक्या पाठवल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी 25 वर्षीय शुभम उपाध्याय या व्यक्तीला उत्तम नगर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरून अटक केली आहे. 'लक्ष वेधण्यासाठी' बॉम्बच्या धमकीचे संदेश पाठवल्याबद्दल अटक केली असल्याचे म्हटले आहे. शुभम उपाध्याय याने टेलिव्हिजनवर बातम्या पाहिल्यामुळे प्रेरित झाल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिस उपायुक्त (IGI) उषा रंगनानी यांच्या म्हणण्यानुसार, 26-29 ऑक्टोबरच्या रात्री ईमेलद्वारे धमक्या पाठवण्यात आल्या. ज्यामुळे विमानतळावरील तात्काळ सुरक्षेची चिंता निर्माण झाली. जलद तपासानंतर, पोलिसांनी उपाध्याय यांचे ईमेल शोधून काढले. त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर धमक्या दिल्याची कबुली दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)