Muslim Marriages Law Abolished in Assam: आसाम सरकारचा मोठा निर्णय! मुस्लिम विवाह कायदा रद्द; मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी 'X'वर दिली माहिती

आम्ही आमच्या मुली आणि बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि बालविवाहाविरूद्ध अतिरिक्त सुरक्षा उपाय सुरू केले आहेत, असं शर्मा यांनी आपल्या X वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

CM Himanta Biswa Sarma (PC - Facebook)

Muslim Marriages Law Abolished in Assam: आसाम सरकार (Assam Government) ने आज मोठा निर्णय घेत मुस्लिम विवाह कायदा रद्द केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा (CM Himanta Biswa Sarma) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. आम्ही आमच्या मुली आणि बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि बालविवाहाविरूद्ध अतिरिक्त सुरक्षा उपाय सुरू केले आहेत, असं शर्मा यांनी आपल्या X वरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. आज आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आम्ही आसाम रिपीलिंग बिल 2024 द्वारे आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा (Assam Muslim Marriages and Divorce Registration Act) आणि नियम 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांचे ट्विट - 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now