Good News For Bank Account Holders: ऑनलाइन फसवणुकीत ग्राहकाच्या खात्यातून पैसे गमावल्यास बँकांना पैसे द्यावे लागतील, NCIB ने दिली माहिती
नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अलीकडेच ट्विटरवर एक माहिती शेअर केली आहे. एनसीआयबीने (NCIB) आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्याच्या बँक खात्यात जमा केलेल्या रकमेची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी आहे.
डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या युगात बँक खात्यातील फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. बँक खात्यातून बेकायदेशीर पद्धतीने अनधिकृत व्यवहार होतात. नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अलीकडेच ट्विटरवर एक माहिती शेअर केली आहे. एनसीआयबीने (NCIB) आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखाद्याच्या बँक खात्यात जमा केलेल्या रकमेची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी आहे. जर तुमच्या खात्यातून फसवणुकीने पैसे काढले गेले, तर बँकेला ते परत द्यावे लागतील, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. एनसीआयबीने म्हटले आहे की, राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या निर्णयानुसार, जर खात्यातून फसवणूक करून पैसे काढले गेले असतील तर त्याला ग्राहक नव्हे तर बँक जबाबदार असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)