Nationwide Strike of Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांचा उद्यापासून 2 दिवसीय देशव्यापी संप; 24 तास वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारचा इशारा

मंत्रालयाने रविवारी सर्व सरकारी युटिलिटीज आणि इतर एजन्सींना उच्च सतर्क राहण्याचा आणि राष्ट्रीय ग्रीडची चोवीस तास वीज पुरवठा आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला.

Power Lines Cables Tower | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Nationwide Strike of Electricity Workers: देशभरातील वीज कर्मचारी 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाणार आहेत. कामगार संघटनांच्या दोन दिवसीय देशव्यापी संपापूर्वी ऊर्जा मंत्रालय हाय अलर्टवर आहे. मंत्रालयाने रविवारी सर्व सरकारी युटिलिटीज आणि इतर एजन्सींना उच्च सतर्क राहण्याचा आणि राष्ट्रीय ग्रीडची चोवीस तास वीज पुरवठा आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा सल्ला दिला. केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील कामगारांवर परिणाम करणाऱ्या धोरणांच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)