Today Gold Price: सोन्याच्या दराने गाठली नवी पातळी! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 91,000; जाणून घ्या आजचा भाव
देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमतीने नवा विक्रम गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील ग्राहक चलनवाढीच्या अपेक्षेपेक्षा कमी आकडेवारीमुळे सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला.
Today Gold Price: सोन्याला गेले काही दिवस सोन्याचे दिवस आलेले पाहायला मिळत आहे. लग्नाचा हंगाम सुरु असल्याने सोन्याची मागणीही जास्त आहे. लग्नाच्या हंगामात सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. सोने प्रति 10 ग्रॅम 91,000 रुपये झाले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोंडीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असताना दिसत आहे. शनिवारी 10 ग्रॅम सोन्याचा बाजारभाव करासह 91,052 रुपये होता. शुक्रवारी तो 91,600 रुपये होता.
सोन्याच्या दरांनी गाठला नवी पातळी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)