Bigg Boss Marathi Season 4: Mahesh Manjrekar चं असणार बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचे होस्ट; पहा नवा प्रोमो
बिग बॉस मराठीचा प्रोमो प्रदर्शित झाला असुन शोचे होस्ट नेहमी प्रमाणे जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकरचं असणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ४ चा प्रोमो बघता प्रेक्षकांमध्ये आताच शो संबंधी उत्सूकता बघायला मिळत आहे.
बहुचर्चित मराठी रिअलिटी (Marathi Reality Show) शो बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असण्याची घोषणा कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीकडून करण्यात आली आहे. कालचं बिग बॉस मराठीचा प्रोमो (Teaser) प्रदर्शित करण्यात आला असुन प्रेक्षकांमध्ये आताच शो संबंधी उत्सूकता बघायला मिळत आहे. या सिझनमध्ये (Season) कुठले कलाकार बिग बॉसच्या घरात हजेरी लावणार यावर चर्चा सुरु झाली आहे. तरी शोचे होस्ट मात्र नेहमी प्रमाणे जेष्ठ मराठी अभिनेते महेश मांजरेकरचं (Mahesh Manjarekar) असणार यावर शिक्का मोर्तब झाला आहे.
मराठी मनोरंजनाचा Bigg Boss येतोय, लवकरच...
आपल्या कलर्स मराठीवर. #ColorsMarathi #RangManalaBidnare #BiggBossMarathi4 #BBM4 pic.twitter.com/nEMKH467iX
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2022 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

