Oscars 2023 साठी पाच भारतीय सिनेमांचं नामांकन, The Kashmir Files, Kantara, RRR, Gangubai Kathiawadi आणि Chhello Show ची ऑस्करकडून निवड

भारतीयांसाठी खुशखबर म्हणजे तब्बल पाच भारतीय सिनेमांना ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं असुन यांत दोन बॉलिवूड सिनेमा, दोन दक्षिणात्य सिनेमा आणि एका गुजराती सिनेमाचा समावेश आहे.

OSCARS (Photo Credits: Getty)

जागतिक सिनेमा अवॉर्डसचा बादशाह ऑस्करच्या नामांकनाची यादी नुकतीचं जाहीर करण्यात आली आहे. त्यात भारतीयांसाठी खुशखबर म्हणजे यावर्षी तब्बल पाच भारतीय सिनेमांना ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं असुन यांत दोन बॉलिवूड सिनेमा, दोन दक्षिणात्य सिनेमा आणि एका गुजराती सिनेमाचा समावेश आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा कश्मिर फाईल्स, कांतारा आणि आरआरआर या सिनेमांना ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. तर गुजराती सिनेमाने देखील ऑस्करच्या नामांकनात स्थान कमावलं आहे. तर संजय लिला भंसालींचा गंगुबाई काठीयावाडी देखील ऑस्करच्या स्पर्धेत उतरली आहे. तरी कुठला भारतीय सिनेमा ऑस्करमध्ये बाजी मारणार ह्याची संपूर्ण भारतीयांना उत्सुकता आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now