Pathaan 2: YRF ने पठाण 2 ची स्क्रिप्ट केली फायनल, चित्रीकरणाला लवकरच करणार सुरुवात
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा त्याच्या सुपरहिट चित्रपट 'पठान' च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. यशराज फिल्म्सने (वायआरएफ) 'पठान 2'ची स्क्रिप्ट अधिकृतरित्या फायनल केली असून रिपोर्टनुसार, लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल. या चित्रपटात दीपिका पदुकोणही यावेळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Pathaan 2: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा त्याच्या सुपरहिट चित्रपट 'पठान' च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. यशराज फिल्म्सने (वायआरएफ) 'पठान 2'ची स्क्रिप्ट अधिकृतरित्या फायनल केली असून रिपोर्टनुसार, लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल. या चित्रपटात दीपिका पदुकोणही यावेळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्रा, श्रीधर राघवन आणि अब्बास टायरवाला यांनी मिळून 'पठाण २'ची दमदार पटकथा तयार केली आहे. यावेळी ही कथा पठाणचा प्रवास दमदारपणे मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्रा गेल्या अनेक महिन्यांपासून स्क्रिप्टवर काम करत आहे. पहिल्या भागापेक्षाही सिक्वेल अधिक भव्य आणि दमदार असेल याची त्यांनी खात्री केली आहे.एसआरकेने पटकथा वाचल्यानंतर त्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
'पठाण २'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)