Mirzapur 3 OTT Release: कधी अन् कुठे स्ट्रीम होणार ‘मिर्झापूर 3’? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
पहिल्या दोन सिझन्सच्या यशानंतर 'मिर्झापूर'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 5 जुलै रोजी मिर्झापूर 3 ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
Mirzapur 3 OTT Release: पहिल्या दोन सिझन्सच्या यशानंतर 'मिर्झापूर'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. येत्या 5 जुलै रोजी मिर्झापूर 3 ही (Mirzapur Season 3)बहुप्रतिक्षित वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कलाकार कोणते असतील? कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी ही सीरिज प्रदर्शित होईल? तिसऱ्या सिझनमध्ये मुन्ना भैय्या जिवंत असेल का? या सीरिजचे एपिसोड्स किती असतील? अशा सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला 5 जुलै रोजी मिळणार आहेत. या गँगस्टर ड्रामामध्ये पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi), अली फजल, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा(Vijay Varma), रसिका दुग्गल यांच्या भूमिका आहेत. गुरमीत सिंहने या सीरिजचं दिग्दर्शन केलंय. त्याच्या प्रदर्शनाच्या वेळेबद्दल बोलायचं झाल्यास, या बहुप्रतिक्षित वेब सीरिजचे सर्व भाग मध्यरात्री स्ट्रीम केले जातील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)