Chowk Trailer: ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘चौक’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (Watch Video)
चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटाची निर्मितीमूल्य या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतात.
सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच (Chowk Trailer) रिलीज झाला आणि तो रिलीज होता क्षणी सगळीकडे व्हायरल झाला आहे. टीझरची सुरूवातच भव्य गर्दीने होते. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चौक चित्रपटाची निर्मितीमूल्य या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतात. याशिवाय ट्रेलरमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील. ‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. हा चित्रपट 19 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.
पहा ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)