Dharmaveer 2: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार धर्मवीर 2 चित्रपट; निर्चीमात्यांची मोठी घोषणा

सिनेमाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dharmaveer

आनंद दिघे यांच्या जीवनावरील 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट महाराष्ट्रात प्रचंड गाजला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा होती. आता या सिनेमाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांची राजकीय कारकीर्द पाहायला मिळाली होती, आता याच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळाले याची उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement