Cannes 2024: जॅकलिन फर्नांडिस 77 व्या चित्रपट महोत्सवात होणार सहभागी – रीपोर्ट

अद्याप कोणतेही अधिकृत समोर आलेली नाही. दरम्यान, या आधीही जॅकलीनने कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती.

Jacqueline Fernandez (PC - Instagram)

Cannes 2024: जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हल (Cannes 2024)मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, कियारा अडवाणी, अदिती राव हैदरी, शोभिता धुलिपाला आणि ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या इतर भारतीय सेलिब्रिटीही कान्स चित्रपट महोत्सवात सामील होणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तिने जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना आपला आनंद व्यक्त केला आहे. जॅकलीन म्हणाली, "जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे खूप छान वाटत आहे. त्याशिवाय, प्रतिष्ठित रेड कार्पेटवर चालणे हा एक सन्मान आहे. जिथे अनेक दिग्गज कलाकार आधीच चालले आहेत." दरम्यान यापूर्वी 2015 मध्ये जॅकलीनने कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. (हेही वाचा:Cannes 2024: 'आई कर्तुत्ववान महिला होती, त्यांचा मुलगा असल्याचा अभिमान'; कान्स चित्रपट महोत्सवात स्मिता पाटील यांच्या मंथन चित्रपटच्या स्क्रीनिंगवर प्रतीक बब्बर याची प्रतिक्रीया )

 

View this post on Instagram

 

A post shared by India Today (@indiatoday)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)