Urvashi Rautela ने Karwa Chauth निमित्त साडी नेसून, भांगात भरले कुंकू; युजर्सनी दिला Rishabh Pant चा नाद सोडण्याचा सल्ला
उर्वशी रौतेलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काल, म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्वशीने लाल रंगाची साडी नेसली आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंत आणि उर्वशीमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळाले. परंतु आता उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा आहे. ऋषभ पंत नुकताच 2022 च्या T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. त्याच्या पाठोपाठ उर्वशी रौतेलाही ऑस्ट्रेलियाला पोहोचली. आता तिने ऑस्ट्रेलियामधून एक फोटो शेअर करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
उर्वशी रौतेलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काल, म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्वशीने लाल रंगाची साडी नेसली आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, भांगात कुंक दिसत आहे. एखाद्या लग्न झालेल्या भारतीय महिलेसारखा हा फोटो आहे. करवा चौथच्या निमित्ताने अभिनेत्रीने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर उर्वशी मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. अनेक युजर्सनी तिला ऋषभ पंतचा नाद सोडून देण्याचा सल्ला दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)