Son of Sardaar2: 'सन ऑफ सरदार 2' मध्ये अजय देवगण, संजय दत्त यांच्यासोबत पंकज त्रिपाठी झळकण्याची शक्यता
'सन ऑफ सरदार 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची तयारी जोरात सुरू असून, प्रेक्षकांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अजय देवगण आणि संजय दत्तसह स्टार-स्टडेड कलाकार स्कॉटलंडमध्ये शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहेत.
'सन ऑफ सरदार 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची तयारी जोरात सुरू असून, प्रेक्षकांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अजय देवगण आणि संजय दत्तसह स्टार-स्टडेड कलाकार स्कॉटलंडमध्ये शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान, ताज्या वृत्तानुसार प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी हासुद्धा या 'सन ऑफ सरदार 2' मध्ये या कलाकारांसोबत प्रथमच दिसणार आहे. याव्यतिरिक्त, संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या आकर्षणात भर पडेल, अशी चर्चा आहे.
रवी किशन 'सन ऑफ सरदार 2' मध्ये?
अजय देवगण आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रवी किशन देखील या कलाकारांमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)