Mangal Dhillon Dies: चित्रपट आणि टीव्ही अभिनेता मंगल ढिल्लन यांचे कर्करोगाने निधन
मंगल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. याशिवाय त्याने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. 1988 मध्ये आलेल्या 'खून भरी मांग' या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसले होते.
Mangal Dhillon Dies: चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लन यांचे निधन झाले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी ते दीर्घकाळ झुंज देत होते. त्यांच्यावर लुधियाना येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारादरम्यान त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला. अभिनेता यशपाल शर्माने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंगल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. याशिवाय त्याने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. 1988 मध्ये आलेल्या 'खून भरी मांग' या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसले होते. (हेही वाचा - Oh My God 2: या तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षयचा 'ओह माय गॉड 2')
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)