Bigg Boss OTT 2: युट्यूबर अभिषेक मल्हानची प्रकृती बिघडली; फुकरा इंसान रुग्णालयात

अभिषेक मल्हानची बहीण प्रेरणा मल्हानने तिच्या ट्विटरवरून चाहत्यांना अभिषेकच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली.

Abhishekh Malhan

बिग बॉस ओटीटी 2 च्या फिनालेला फक्त एकच दिवस उरला आहे. मात्र यातच बिग बॉस 'ओटीटी 2'मधील स्पर्धक अभिषेक मल्हानची प्रकृती अचानक बिघाडली आहे.  अभिषेक मल्हानची बहीण प्रेरणा मल्हानने तिच्या ट्विटरवरून चाहत्यांना अभिषेकच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली. अभिषेकची तब्येत खूपच खराब आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तो आज परफॉर्म करणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now