Bigg Boss Marathi Season 5: कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये उलटफेर; बिग बॉसने गेममध्ये आणला मोठा ट्वीस्ट
बिगबॉसच्या या निर्णयानंतर घरात एकच खळबळ उडाली असून आता काही सदस्य या निर्णयाने खुश झाले आहे तर काही नाराज.
'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात आता पुन्हा एकदा मोठी अपडेट घडली आहे. बीबी करन्सी टास्कनंतर घराचा कॅप्टन निवडण्यात येणार आहे. या निवडीमध्ये आता मोठा ट्वीस्ट आला आहे. कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण विजेता होणार आणि कॅप्टनसी मिळवण्यासाठी कोण कोणाला फेव्हर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना विजेत्या संघाने कॅप्टन निवडण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर आता बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांवर कॅप्टन निवडण्याची जबाबदारी ही सोपवली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)