अभिनेत्री Ileana D'Cruz झाली आई, दिला मुलाला जन्म; शेअर केला बाळाचा पहिला फोटो

यामध्ये तिने आपल्या मुलाची पहिली झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या मुलाचे नावही उघड केले आहे. इलियानावर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बाळाचा फोटो शेअर करत तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याचं नाव सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या घरी आनंदाने दार ठोठावले आहे. अभिनेत्री आई झाली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे. या खास प्रसंगी अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्या मुलाची पहिली झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या मुलाचे नावही उघड केले आहे. इलियानावर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बाळाचा फोटो शेअर करत तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याचं नाव सांगितलं आहे. ही पोस्ट करत तिने लिहिलं, 'आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे हे कोणत्याही शब्दात सांगू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय. असं लिहीत तिने बाळाचा फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबतच त्याचं नावही लिहिलं आहे. तिच्या बाळाचं नाव आहे कोआ फिनिक्स डोलन. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement