Stunt Man Dies: 'सरदार 2' चित्रपटाच्या सेटवर 20 फूटांवरून कोसळून स्टंटमनचा मृत्यू

विरुगंबक्कम पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

'सरदार-2' या चित्रपटाच्या सेटवर स्टंटच्या दरम्यान 20 फूटांवरून कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. एलुमलाई असे मृत्यू झालेल्या सीनियर स्टंटमॅनचे नाव असून ते 54 वर्षांचे होते. चित्रपटात स्टंट करताना 20 फूटांवरून कोसळून त्यांचे निधन झाले. एलुमलाई यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार यांच्या अनेक सिनेमांमध्ये स्टंट केले होते. मंगळवारी ते कार्तीच्या 'सरदार 2' या चित्रपटासाठी स्टंट करत असताना हा अपघात झाला.  अपघातानंतर त्यांना तातडीने  रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत आणि उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  विरुगंबक्कम पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement