Aamir Khan Deepfake Video: आमिर खानच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल, सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरु

आमिर खानच्या तक्रारीनंतर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करत आहे.

Aamir Khan (PC - Instagram)

अभिनेता आमिर खान राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याची डीपफेक तंत्रज्ञानाद्वारे बनवलेली चित्रफीत सोशल मीडियावर व्‍हायरल झाली होती. याप्रकरणी खार पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. आमिर खानचा आवाज बदलण्यात आला असून ही चित्रफीत ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातील आहे. त्यात भाजपवर टीका करून आमिर काँग्रेसला पाठिंबा दर्शवत असल्याचे दाखवले आहे. आमिर खानच्या तक्रारीनंतर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement