Chhaava Joins 600 Crore Club: ब्लॉकबस्टर 'छावा' 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील; पुष्पा 2, स्त्री 2 सारख्या सिक्वल्ससोबत गणना

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात एकूण 600.10 कोटींची कमाई केली आहे. ज्यामुळे तो ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

Chhaava Poster| @Maddock Films/ Instagram

Chhaava Joins 600 Crore Club: छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' (Chhaava Collection) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात एकूण 600.10 कोटींची कमाई केली आहे, ज्यामुळे तो ऑलटाइम ब्लॉकबस्टर (Blockbuster Chaava) चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या कमाईची माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की, 'छावा' हा पुष्पा 2 आणि स्त्री 2 नंतरचा तिसरा चित्रपट आहे. आठवड्याच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'छावा' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 225.28 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.84 कोटी, चौथ्या आठवड्यात 43.98 कोटी, पाचव्या आठवड्यात 31.02 कोटी, सहाव्या आठवड्यात 15.60 कोटी, सातव्या आठवड्यात 7 कोटी,आठव्या आठवड्यात 3.50 कोटी, नवव्या आठवड्यात 2.30 कोटी आणि दहाव्या आठवड्याच्या शेवटी 30 लाख अशी कमाई केली.

'छावा' 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement