‘Ghajini 2’: आमिर खान आणि सुर्या एकाच वेळी हिंदी आणि तमिळमध्ये येणाऱ्या गजनी 2 साठी शूट करणार? जाणून घ्या, अधिक माहिती

ए.आर. मुरुगादॉस दिग्दर्शित, सुर्या अभिनीत तमिळ पिक्चर 2005 मध्ये रिलीज झाला, तर आमिर खान स्टारर 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपट प्रचंड हिट ठरले आणि त्यांच्या आकर्षक कथानकामुळे, सशक्त कथाकथनामुळे आणि गाण्यांमुळे त्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. ताज्या अपडेट्सनुसार, या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे.

Ghajini 2

‘Ghajini 2’:  गजनी चित्रपट तामिळ आणि हिंदी दोन्ही आवृत्त्यांमध्ये सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. ए.आर. मुरुगादॉस दिग्दर्शित, सुर्या अभिनीत तमिळ पिक्चर 2005 मध्ये रिलीज झाला, तर आमिर खान स्टारर 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपट प्रचंड हिट ठरले आणि त्यांच्या आकर्षक कथानकामुळे, सशक्त कथाकथनामुळे आणि गाण्यांमुळे त्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. ताज्या अपडेट्सनुसार, या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, गजनी 2 च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. नवीन अपडेटवरून असे दिसून आले आहे की, आमिर खान आणि सुर्या एकाच वेळी चित्रपटाच्या सिक्वेलसाठी शूटिंग करणार आहेत. तत्पूर्वी, पिंकव्हिलाशी बोलताना सुर्याने गजनी २ वर काम सुरू असल्याची पुष्टी केली आणि म्हणाले, “बऱ्याच काळानंतर अल्लू अरविंद (निर्माता) यांनी ही कल्पना सुचली आणि ते शक्य होईल का, असे विचारले. मी म्हणालो, नक्कीच, सर, गजनी 2 होऊ शकते."  "रीमेक" टॅग टाळण्यासाठी, दोन्ही चित्रपट एकाच वेळी शूट केले जातील. हे देखील वाचा: IIFA Awards 2024 on TV: चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! लवकरच टीव्हीवर टेलिकास्ट होणार यंदाचा आयफा अवॉर्ड्स 2024, जाणून घ्या कधी व कुठे

आमिर खान आणि सुर्या एकाच वेळी 'गजनी 2' चे शूट सूरु करणार

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Pinkvilla South (@pinkvillasouth)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)