#Video: विषारी Eastern Brown सापाला सामोरे जात आईने वाचवले आपल्या दोन मुलींचे प्राण; कॅमेऱ्यात कैद झालेला हा थरार पहा

मुलींना वाचवण्यासाठी सापाशी लढणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून या आईचे सर्वाकडून कौतुक होत आहे.

Snake Attack (Photo Credits: Twitter)

मुलांसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या अनेक माता आपण आजवर पाहिल्या आहेत. असाच एक प्रकार पोर्च मधील क्वीन्सलँड मध्ये देखील घडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मध्य क्वीन्सलँडच्या (Centra Queensland)  एका रहिवाशी भागात अलीकडेच Eastern Brown हा एक विषारी साप आढळून आला होता, हा साप एका महिलेच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता, योगायोगाने याच वेळी महिलेच्या मुली घराबाहेर आल्या. या सापाने मुलींवर हल्ला करायला जाताच या महिलेचे लक्ष गेले आणि कशाचंही विचार न करता तिने सापाला तिथून बाजूला करत आपल्या मुलींना खेचून घेतले. वास्तविक एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटावी अशी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलींना वाचवण्यासाठी सापाशी लढणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून या आईचे सर्वाकडून कौतुक होत आहे. भुकेने साप झाला सैरभैर, दुसरा प्राणी समजून गिळले स्वतःचे अर्धे शरीर (Watch Video)

ABC न्यूजने शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये साप घराबाहेर फर्स्ट असल्याचे दिसत आहे यावेळी अचानक एक मुलगी खांद्याला बॅग लावून घरातून बाहेर येते तिच्या मागे तिचे आई आणि दुसरी बहीण सुद्धा बाहेर पडते. हा साप तिला चावायला जाणार इतक्यात आईचे लक्ष जाऊन ती मुलीला खेचून घेते. यावेळी साप मुलीच्या पायाभोवतीच अडकतो तरीही डोकं लावून ही महिला आपल्या मुलीला बाजूला करून घेते. तर दुसरी मुलगी दाराजवळच रडत उभी असते. मुलीला दूर करताच साप सुद्धा घाबरून निघून जातो.

पहा हा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, Eastern Brown हा महाभयंकर साप मानला जातो. तो अगदी बारीक असल्याने अधिक आक्रमक असतो, या सापाच्या दंशाने आजवर ऑस्ट्रेलियात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे शहरी भागातच या सापांचे प्रमाण अधिक असून घराच्या लाकडी भागात, किंवा गवतात हे साप आढळून येतात.