Viral Video: लखनऊमध्ये चालत्या कारला लागली आग, चालक वेळेत बाहेर पडल्याने बचावला, व्हिडीओ व्हायरल

रस्त्याच्या मधोमध ही घटना घडली. कार चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. विकास नगर भागातील रिंगरोड विन पॅलेससमोर कारला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. चालत्या कारमधून धूर निघू लागताच चालक गाडी सोडून बाहेर आला आणि काही वेळातच कारमधून आगीचे लोट निघत होते.

Viral Video

Viral Video: लखनऊमध्ये चालत्या कारला अचानक आग लागल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. रस्त्याच्या मधोमध ही घटना घडली. कार चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. विकास नगर भागातील रिंगरोड विन पॅलेससमोर कारला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. चालत्या कारमधून धूर निघू लागताच चालक गाडी सोडून बाहेर आला आणि काही वेळातच कारमधून आगीचे लोट निघत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

येथे पाहा व्हिडीओ: 

#लखनऊ : चलती कार बनी आग का गोला,रिंग रोड पर चलती कार में अचानक लगी आग, कार सवारों ने गाड़ी से निकलकर ख़ुद को बचाया, देखते ही देखते कार हुई जलकर ख़ाक,विकास नगर इलाके की रिंग रोड विन पैलेस के सामने का मामला, मौके पर पुलिस मौजूद।#Lucknow @lkopolice #Breaknewsindia1 #BreakNews pic.twitter.com/svObnli51k

— Breaknewsindia (@BreakNewsIndia1) November 3, 2024



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif