Viksit Bharat Sampark WhatsApp Message खरा की खोटा? जाणून घ्या 'Letter From Prime Minister' अधिकृत नंबर वरूनच पाठवलं आहे हे कसं तपासाल?

तुमची खाजगी माहिती, आर्थिक व्यवहार यामध्ये फसवणूक केली जाऊ शकते.

Viksit Bharat Sampark WhatsApp Message (Photo Credits: WhatsApp)

भारतामध्ये लोकसभा निवडणूकांचे रणशिंग फुंकलं गेलं आहे. आता प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. यंदा भाजपाने 400 पार चा नारा देत प्रचार जोरदार करण्यास सुरूवात केली असताना सध्या अनेक भारतीयांना व्हॉट्सअ‍ॅप वर "Letter From Prime Minister Narendra Modi" मिळाले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पत्र आहे. Viksit Bharat Sampark या व्हॉटसअ‍ॅप वरील बिझनेस अकाऊंट वरून पत्र मिळाले आहे. तर Viksit Bharat Sampark हे व्हेरिफाईड बिझनेस अकाऊंट आहे. 9275536906 या मोबाईल नंबर वर ते रजिस्टर आहे. दरम्यान भारत सरकारच्या प्रमुख योजनांचे मूल्यमापन आणि अंमलबजावणी तसेच वितरणामध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू असलेला उपक्रम आहे. असे Info section मध्ये देण्यात आले असून Ministry of Electronics and Information Technology कडून ते हाताळले जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हांला "Letter From Prime Minister" हे Viksit Bharat Sampark अकाऊंट वरून आलं असल्यास तो मेसेज फेक नाही तर खरा आहे.

दरम्यान तंत्रज्ञान जसं प्रगत होत आहे तसे सायबर क्राईमचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जागृक असणं आवश्यक आहे. Viksit Bharat Sampark अकाऊंट शी साधर्म्य साधत बनावट अकाऊंट बनवलं जाऊ शकतं. तुमची खाजगी माहिती, आर्थिक व्यवहार यामध्ये फसवणूक केली जाऊ शकते.

Viksit Bharat Sampark च्या नावे आलेल्या मेसेज मध्ये नंबर देखील तपासून पहा.

9275536906 या मोबाईल नंबर वरून तुम्हांला मेसेज मिळाला नसेल तर तो खोटा असू शकतो. Viksit Bharat Sampark WhatsApp message मध्ये कोणतीही लिंक नाही. त्यामुळे तुम्हांला आलेल्या मेसेज मध्ये लिंक असेल तर त्यापासून सावध रहा. अनोळखी लिंक वर क्लिक केल्यास स्कॅम होण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif