Swiggy वरुन ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थात मिळाला रक्तातील बँडेज, तरुणाकडून फेसबुकवर याबाबत खुलासा
ऑनलाईन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी (Swiggy) च्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थात एका तरुणाला रक्त लागलेला बँडेज मिळाला असल्याची प्रकार घडला आहे.
ऑनलाईन फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी (Swiggy) च्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थात एका तरुणाला रक्त लागलेला बँडेज मिळाला असल्याचा प्रकार घडला आहे. तर या तरुणाने फेसबुकवर पोस्ट लिहित स्वीगी वरुन ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थाचा खुलासा केला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.
चेन्नई (Chennai) येथे राहणाऱ्या बालमुरुगन दीनदयालन या तरुणाने स्वीगी वरुन चॉप अॅन्ड स्टिक हॉटेलमधून खाण्यासाठी मागवले होते. त्यावेळी अर्ध खाऊन झाल्यानंतर त्याला खाण्यामध्ये रक्तातील बँडेज मिळाल्याने धक्का बसला. याबद्दल दीनदयालन ह्याने स्वीगीकडे तक्रार केली आहे. तसेच स्वीगीने ही याबाबत तपास केला जाईल असे आश्वासन तरुणाला दिले आहे.
तसेच हॉटेल मालकाने या तरुणाला खाद्यपदार्थाचे संपूर्ण पैसे परत दिले आहेत.तसेच हॉटेल मालकाने यावर उत्तर असे म्हटले आहे की, हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याच्या हाताला लागले असल्याने त्याने ती बँडेज लावली असल्याचे कबूल केले आहे. तर यापुढे हॉटेलकडून अशा पद्धतीचा कोणताही हलगर्जीपणा होणार नसल्याचे ही मालकाने सांगितले आहे.