छोट्या पडद्यावरील हॉट अभिनेत्री रश्मि देसाई (Rashmi Desai) सोशल मिडियावर आपल्या हॉट आणि सेक्सी फोटोजने आग लावत आहे. तिचे बोल्ड अँड ब्युटीफुल (Bold and Beautiful) व्हिडिओज, फोटोज पाहण्यासाठी चाहतेही आसुसलेले असतात. रश्मि देखील सोशल मिडियाद्वारे चाहत्यांशी जोडलेली असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील शॉर्ट स्कर्टमधील तिचा हॉट लूक (Hot Look) चाहतेही भांबावले आहेत. रश्मिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
रश्मि देसाईच्या या व्हिडिओमध्ये ती एक शॉर्ट स्कर्ट घालून स्टायलिश अंदाजात चालताना दिसत आहे. रश्मि देसाईचा हा अवतार लोकांच्या नजरा नक्कीच वळवून घेईल असा आहे.हेदेखील वाचा-
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये तिने पिवळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. यात तिच्या मादक आणि बोल्ड अदा चाहत्यांवर भुरळ पाडल्याखेरीज राहणार नाही.
बिग बॉस 12 मध्ये आपल्या दिलखेचक अदा, कधी दिलखुलास आणि कधी फटकळ तोंडामुळे नेहमीच प्रसिद्धी झोतात असलेल्या रश्मिने जरी विजेतेपदावर नाव कोरले नसले तरीही तिचा प्रचंड मोठा असा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 4.3 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
'उतरन' या तिच्या हिंदी मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ती तिच्या खाजगी आयुष्यातील घडामोडीमुळेही प्रचंड चर्चेत राहिली. मात्र आता तिच्या बोल्ड शूटमुळे (Bold Photoshoot) ती चर्चेत आली आहे. या फोटोशूटने बोल्डनेसच्या सा-या सीमा पार केल्या आहेत.