Wedding With Transwoman: पत्नीच्या संमतीने ट्रान्सवुमनशी 'लग्न', पठ्ठ्या एकाच घरात दोन बायका नांदवत करतोय सुखी संसार

ट्रान्सवूमनच्या प्रेमात पडलेल्या या पुरुषाने त्या ट्रान्सवूमनशी लग्न केलं असुन या पुरुषाच्या पहिल्या बायकोने दुसऱ्या बायकोस एकाचं घरात राहायची परवानगी दिली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

विवाहीत पुरुष (Married Man) परस्त्रीच्या प्रेमात पडताना तुम्ही अनेकदा बघितलं असाल. एवढचं नाही तर दुसरा विवाह (Second Marriage) करुन संसार करतानाचा तुम्ही ऐकलं असालं. पण विवाहीत पुरुष चक्क ट्रान्सवूमनच्या प्रेमात पडल्याची अजब घटना ओडीशात (Odisha) घडली आहे. 22 वर्षीय विवाहीत पुरुष (Married Man) एका ट्रान्सजेंडरच्या (Transgender) प्रेमात पडला आणि धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार त्याच्या पत्नीपुढे (Wife) आला. सर्वसामान्यपणे आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत माहिती मिळाल्यावर पत्नीचा आक्रोश अगदी उंच्चांकाचा असतो. पण या दामपत्यांबाबत काही विचित्रचं घडलं आहे. कारण विवाहबाह्य संबंध असलेल्या पतीला पत्नीने थेट दुसरा विवाह (Wedding) करण्याची परवानगी दिली. एवढचं नाही तर ट्रान्सवूमनच्या प्रेमात पडलेल्या या पुरुषाने त्या ट्रान्सवूमनशी लग्न केलं असुन या पुरुषाच्या पहिल्या बायकोने दुसऱ्या बायकोस एकाचं घरात राहायची परवानगी दिली आहे.

 

एकाच घरात हा पठ्ठ्या पहिली बायको आणि दुसऱ्या ट्रन्सवूमन बायको (Transwoman Wife) बरोबर सुखाचा संसार करतो. धक्कादायक बाब म्हणजे एका ट्रान्सवूमशी (Transwoman) दुसर लग्न करणारा हा पुरुष एका मुलाचा पिता आहे. गेल्या वर्षभरापासून या पुरुषाचे एका ट्रान्सजेंडरसोबत (Transgender) प्रेमसंबंध होते. पत्नीला हे कळताच तिने आनंदाने दोघांना लग्न करून एकत्र राहण्याची परवानगी दिली. तथापि हिंदू विवाहात (Hindu Wedding) पहिली पत्नी असताना दुसरा विवाह कायदेशीर नाही. ओडिशाच्या (Odisha) कलहंडी (kalhandi) गावातील हा प्रकार असुन या अनोख्या विवाहाची मोठी चर्चा होत आहे. (हे ही वाचा:- Doctor Viral Video: वेळेत शस्त्रक्रीया करण्यासाठी 45 मिनिटं धावत सर्जनने गाठलं हॉस्पिटल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल)

 

ओडिशातील नार्ला (Narla) येथील एका मंदिरात ट्रान्स कम्युनिटीच्या (Trans Community) अनेक सदस्यांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाह पार पडला. सेबकरी किन्नर महासंघाच्या अध्यक्षा कामिनी यांनी पुढाकार घेऊन दोघांचे लग्न लावून दिले. एवढचं नाही तर या विवाह सोहळ्यास या पुरुषाची पहिली पत्नी देखील हजर होती.  हिंदू विवाहामध्ये जोपर्यंत पहिली पत्नी कायदेशीररित्या पहिल्या पत्नीपासून विभक्त होत नाही तोपर्यंत दुसरा विवाह कायदेशीर मानला जात नाही यावरही या पुरुषाने चिंता व्यक्त केली असली तरी संबंधीत प्रकाराबाबत पुरुषाने लेखी माहिती पोलिस स्थानकात (Police Station) सुपूर्त केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement