मालदीव मध्ये बिकिनी बॅन? अंगप्रदर्शन करण्याचा आरोप करत तरुणीला हिंसकरित्या अटक; व्हिडीओ झाला व्हायरल

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Bikini woman arrested in Maldives (Photo Credits: Video Grab)

स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालदीव (Maldives) मध्ये एक विचित्र घटना घडली आहे, मालदीव मधील माफुशी बेटावर एका समुद्र किनारी एका ब्रिटिश महिलेला बिकिनी (Bikini) घातल्यामुळे पोलिसांच्या हिंसक कारवाईचा त्रास सहन करावा लागल्याचे समजतेय. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस बिकिनी घातलेल्या तरुणीला अंगप्रदर्शन करण्याचा आरोप करत अटक करताना दिसत आहेत, यात आक्षेपार्ह्य पद्धतीने पोलीस महिलेला खेचून नेताना दिसत आहेत, त्यामुळे या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जपान: Sex Doll वर केले जातात अंत्यसंस्कार; खर्चाचा आकडा ऐकुन व्हाल चकित

व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे,पोलीस खेचून नेत असताना ही महिला "तुम्ही माझ्यावर लैंगिक अत्याचार करत आहात!" असे किंचाळत पोलिसांना थांबवत होती, यादरम्यान पोलिसांनी तिला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या एका पोलिसाने तिचे शरीर झाकण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या शरीरावर पोलिसांनी दांड्याने फटके मारत तिला खेचून नेत अटक केल्याचे या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.हा प्रकार व्हिडीओ मध्ये कैद होताच काहीच वेळात प्रचंड व्हायरल झाला होता, यावर अनेकांनी पोलिसांना खडेबोल सुनावल्यावर अखेरीस आता पोलिस आयुक्तांनी झाल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच या महिलेला सोडून देण्यात आले.

पहा हा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान मालदीव मध्ये पर्यटन स्थळी बिकिनी घालण्याची परवानगी आहे मात्र त्यावर काही बंधने आहेत. कोणीही आपण राहत असलेल्या रिसॉर्ट्स पासून दूर तसेच स्थानिक बेटांवर या परिधानात प्रवेश घेऊ शकत नाहीत. असे केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई सुद्धा करू शकतात ,मात्र या प्रकरणात कारवाईसाठी वापरलेली पद्धत वादाचा मुद्दा ठरत आहे.