2019 मध्ये Period, साडी, रिक्षा, मंदिर सह 59 नव्या Emojis युजर्सच्या भेटीला
सोशल मीडियामुळे संपर्कात राहणे, एखादा मेसेज पटकन पोहचवणे यांसारख्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
New Emojis in 2019: सोशल मीडियामुळे संपर्कात राहणे, एखादा मेसेज पटकन पोहचवणे यांसारख्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरील चॅट, पोस्टची गंमत इमोजीने अधिक वाढते. खूप न लिहिता फक्त एखादा इमोजी टाकून आपण आपल्या भावना व्यक्त करु शकतो. यासाठी नवनवे इमोजीज सादर होत आहेत. आता नववर्षाच्या सुरुवातीलाच नवे आकर्षक इमोजीची यादी सादर झाली आहे.
या यादीत वेगवेगळ्या प्रकारचे 59 नवे इमोजीसचा समावेश आहे. यात लिंग आणि स्किन टोननुसार 171 वेरिएंटमध्ये इमोजीस सादर झाले आहेत. इमोजीसच्या या नव्या यादीत कृत्रिम यांत्रिक हात, बहिरे लोग, बर्फ, जांभई देणारा चेहरा, साडी, मंदिर, रिक्षा यांसारखे वेगवेगळे इमोजीस आहेत. हे इमोजीस लवकरच सादर होतील अशी चर्चा असली तरी याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र याचे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहेत.
तुम्हीही पहा हे नवनवे इमोजीस:
Emojipedia ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला या नव्या इमोजीसची घोषणा करण्यात येईल आणि वर्षाखेरीसपर्यंत हे इमोजीस तुमच्या भेटीला येतील.