चर्चगेट वरून ट्रेन पकडताच येणार मोदी लाटेचा प्रत्यय, नेटकऱ्यांमध्ये रंगलीय हटके चर्चा (See Photos)
लोकसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळालेल्या मोदी लाटेवर सध्या सोशल मीडियामध्येएक हटके चर्चा रंगली आहे, जाणून घ्या नेटकऱ्यांचे म्हणणं काय आहे..
Twitter Reactions On Modi Wave: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) हे पर्व काल लागलेल्या निकालानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपाच्या विजयाने संपुष्टात आले. देशभरातील 300 पेक्षा जास्त जागांवर मोदी सरकारचे वर्चस्व प्रस्थपित झाले असून आता सर्वत्र निकाल व विजयाच्या चर्चा सुरु आहेत. यंदाची निवडणूक उत्साही सोशल मीडियाच्या प्रभावामुळे चांगलीच रंगली होती. निकालानंतर देखील सोशल मीडियावरून मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र या अभिनंदनाच्या पोस्टमध्ये एक हटके ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. "देशभरातील मोदी लाट इतकी प्रचंड होती की त्याचा प्रत्यय तुम्हाला चर्चगेट वरून ट्रेन पकडत उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरु करताच येऊ लागेल, काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला पहिला उमेदवार सापडायला देखील पंजाब पर्यंत वाट बघावी लागणार आहे असे निरीक्षण या ट्विटमधून नेटकऱ्यांनी शेअर केले आहे.
व्हायरल पोस्टवर टाका एक नजर...
एकीकडे भाजपा समर्थकांनी चर्चगेट वरून ट्रेन पकडल्यास चारही बाजूला मोदींची लाट कशी पसरली आहे याचा अहवाल मांडला आहे, तर काँग्रेस समर्थक हे भाजपाच्या दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात झालेल्या पराभवाचा आधार घेऊन उत्तर देताना दिसतायत.
काल लोकसभा निवडणुक निकालाच्या वेळी देखील चर्चगेट स्टेशन प्रवाश्यांना पाहता येण्यासाठी निकालाचे स्क्रिनिंग करणारे प्रोजेक्टर्स लावण्यात आले होते. त्यामुळे निकाल बघण्यासाठी आणि मग त्याचा प्रत्यय घेण्यासाठी चर्चगेट स्टेशन वरून प्रवास करून पहावा असा सल्ला नेटवर दिला जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांचा दारुण पराभव झाला होता यानंतर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर मीम्सचे वारे वाहू लागले. भाजपा समर्थकांनी राहुल गांधी व मनसेचे राज ठाकरे यांच्यावर तर हल्लाबोलच केला होता. राज ठाकरेंनी मोदी- शहा मुक्त भारत अशी आरोळी देत महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या पण त्याचा परिणाम कुठेही दिसून न आल्याने नेटकऱ्यांनी चिमटे घ्यायला सुरवात केली आहे.