मेरठ: मुस्लीम व्यक्तीने लग्नपत्रिकेवर गणपती आणि राधा-कृष्णाचा फोटो छापून दिले कन्येच्या विवाहाचे आमंत्रण
तसेच या फोटोत चाँद मुबारक असंही लिहिण्यात आले आहे. ही खूपच वेगळी आणि कौतुकास्पद अशी घटना आहे असं म्हणायला हरकत नाही.
हिंदू-मुस्लीम मधील भेदभाव कमी करण्यासाठी देशात सर्वच स्तरातून बरेच प्रयत्न सुरु आहेत. यात सरकारने तर पुढाकार घेतला आहेच पण नागरिकही पुढे सरसावलेले आपल्याला पाहायला मिळतेय. त्याचाच एक भाग म्हणून एक कौतुकास्पद अशी घटना मेरठ (Meerut) मध्ये घडली आहे. येथील एका मुस्लीम व्यक्तीने आपल्या मुलीच्या पत्रिकेत गणपती आणि राधाकृष्णाचा फोटो छापला आहे. तसेच या फोटोत चाँद मुबारक असंही लिहिण्यात आले आहे. ही खूपच वेगळी आणि कौतुकास्पद अशी घटना आहे असं म्हणायला हरकत नाही.
ही अनोखी पत्रिका हस्तिनापूर येथे राहत असलेल्या मोहम्मद शराफत यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी छापली आहे. त्यांची मुलगी आसमा खातूनचा 4 मार्च रोजी विवाह होणार आहे. यासाठी त्यांनी आपल्या पत्रिकेच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. खुशखबर! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मोदी सरकाचे मोठे गिफ्ट; मदत म्हणून मिळणार 2.5 लाख रुपये
“देशात एकीकडे धार्मिक द्वेष वाढत असताना हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवण्यासाठी ही चांगली कल्पना असल्याचं मला वाटलं. माझ्या या निर्णयाला मित्रांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,” असं मोहम्मद शराफत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
दरम्यान, मोहम्मद शराफत यांनी मित्र आणि नातेवाईकांसाठी उर्दू भाषेत वेगळी लग्नपत्रिका छापली आहे. माझे अनेक नातेवाईक आणि मित्र आहेत ज्यांना हिंदू वाचता येत नाही. त्यांच्यासाठी मी उर्दू भाषेतही लग्नपत्रिका छापली आहे असं मोहम्मद शराफत यांनी म्हटलं आहे.