मुंबईवरील निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर सोशल मीडियात धम्माल मीम्स व्हायरल!
पहा धम्माल मीम्स आणि जोक्स...
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईची सुटका झाली. मागील दोन दिवसांपासून मुंबई रेड अलर्ट वर होती. दरम्यान अलिबाग येथे लँडफॉल झाल्यानंतर वादळाने दिशा बदलली आणि मुंबापुरी बचावली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर मुंबईकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. हाच आनंद मुंबईकरांना सोशल मीडिया माध्यमातून व्यक्त केला. दरम्यान मुंबईवरील निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर सोशल मीडियात धम्माल मीम्स व्हायरल होत आहेत. (निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार)
काल आलेले निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्यावरुन पुढे गेले. यावेळी मुंबई आणि ठाणे या भागात ताशी 90-100 किमी वेगाने वारे वाहत होते. तसंच मुंबई आणि ठाणे परिसरातील काही भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत होती. तर रायगड जिल्ह्यामध्ये कित्येत घरांचे छप्पर उडाल्याच्या घटना समोर आल्या. रायगड जिल्ह्यात झालेले नुकसानाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळाले. परंतु, आता चक्रीवादळाचा धोका टळल्याने मुंबईकरांना सुरक्षित वाटत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर मजेशीर मीम्स आणि जोक्स पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स:
मुंबई शहारातील बहुतांश भाग सुरक्षित असला तरी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. दरम्यान कोणत्याही घटनेवर, गोष्टीवर मीम्स व्हायरल होणे हे सध्याच्या काळात अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळापासून मुंबापुरी सुरक्षित झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला.