Lakhimpur Kheri Shocker: पाळीव कुत्र्याची तक्रार केल्याने तरुण संतापला, तक्रार करणाऱ्या तरुणींना केली काठीने मारहाण

सध्या यूपीमधील लखीमपूर खेरी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दबंग तरुण दोन मुलींना काठीने मारहाण करताना दिसत आहे. गोला येथील मोहम्मदी रोडवर असलेल्या मोहल्ला मुन्नूगंजमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी आरोपी तरुणाने कुत्रा पाळला आहे, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होतो. मुलींनी तक्रार करण्याचे धाडस केले असता तरुण संतप्त झाला आणि त्याने त्यांना मारहाण केली.

Lakhimpur Kheri Shocker

Lakhimpur Kheri Shocker: सध्या यूपीमधील लखीमपूर खेरी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दबंग तरुण दोन मुलींना काठीने मारहाण करताना दिसत आहे. गोला येथील मोहम्मदी रोडवर असलेल्या मोहल्ला मुन्नूगंजमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी आरोपी तरुणाने कुत्रा पाळला आहे, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होतो. मुलींनी तक्रार करण्याचे धाडस केले असता तरुण संतप्त झाला आणि त्याने त्यांना मारहाण केली. तरुणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, मात्र तरुणाचा राग काही कमी झाला नाही. या घटनेबाबत मुलींनी गोला पोलिस स्टेशनला तक्रार पत्र दिले आहे. हे देखील वाचा:  Viral Video: मित्राच्या लग्नात तरुणाला स्टेजवर हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू, कुरनूल जिल्ह्यातील व्हिडिओ व्हायरल

येथे पाहा घटनेचा व्हिडीओ: 

 पाळीव कुत्र्याबद्दल तक्रार केल्याने तरुण संतापला

या घटनेने यूपीमधील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना रोज समोर येत असल्याने महिला आणि त्यांचे कुटुंब असुरक्षित वाटत आहे. सोशल मीडियावर लोकांनी याला महिलांवरील हिंसाचार म्हटले असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या तरी याप्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement