Kiren Rijiju's Dance Video Viral: केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिोत किरण रिजिजू हे एका लोकगितावर डान्स (Kiren Rijiju's Dance Video Viral) करताना दिसतात.

Kiren Rijiju Dance | (Photo Credit: Koo)

केंद्रीय कायदेमंत्री मंत्री किरण रिजिजू (Union Law and Justice Minister Kiran Rijiju) यांचाएक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिोत किरण रिजिजू हे एका लोकगितावर डान्स (Kiren Rijiju's Dance Video Viral) करताना दिसतात. स्वत: किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांनीच हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया कू (Koo) अकाउंटवर शेअर केला आहे. किरण रिजजू यांच्यासोबत एक महिलाही लोकगितावर नृत्य करताना दिसत आहेत. मात्र, या महिला स्थानिक कलाकार आहेत की आणखी कोणी याबाबत तपशील मीळू शकला नाही.

किरण रिजिजू यांनी Koo वर आपला डान्स व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, विवेकानंद केंद्र विद्यालय परियोजनेच्या तपासणीसाठी सुंदर लाजलंग गावात माझी रॅली होती. या रेॅलीदरम्यान गावकऱ्यांनी पारपरीक पद्धतीने आमचे स्वागत केले. या वेळी मूळ लोक गीत आणि नृत्य हे अरुणाचल प्रदेशच्या प्रत्येक समूहाची ओळख आहे. (हेही वाचा, Auto Rickshaw Driver Saves Woman: रिक्षाचालकाने वाचवले ट्रेनखाली आत्महत्या करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचे प्राण (Watch Video))

Koo

या व्हिडिओत आपण पाहू शकता एक व्यक्ती ढोल आणि झांज वाजवत आहे. त्यावर किरण रिजिजू यांनी ठेका धरला आहे. तर उपस्थितही टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करत आहेत. जवळपास 40 मीडिटांच्या या व्हिडिओत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचाही डान्स पाहायला मिळतो. त्याचा हा डान्स सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. कहींनी हा व्हिडिओ शेअर केला आहे तर काहींनी प्रतिक्रिया दिली आहे. सुंदर डान्स. दरम्यान, किरण रिजीजू यांचा या आधी एक गाणे गायल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.