केरळ: चेरावल्ली मशिदीत मुस्लीम समाजाने लावून दिला हिंदू पद्धतीने विवाह; 10 तोळं सोन्याने सजवली नवरी
केरळच्या अलपुझा (Alpuza) जिल्ह्यामधील कायमकुलम (Kayamkulam) येथील मुस्लीम समाजाने पुढाकार घेत एका हिंदू मुलीचे अगदी रीतसर हिंदू पद्धतीने लग्न लावून दिले आहे. खास म्हणजे हा सोहळा याच जिल्ह्यतील 100 वर्षे जुन्या चेरावल्ली मशिदीत (Cheravalli Masjid) पार पडला
जातीय वादावरून संतापाची, हिंसेची, द्वेषाची अनेक उदाहरणे आपण आजवर देशभरातून ऐकली आहेत, पण या सर्वाला प्रेमाने सडेतोड उत्तर देणारा एक खास सोहळा केरळ (Keral) मध्ये पाहायला मिळाला. केरळच्या अलपुझा (Alpuza) जिल्ह्यामधील कायमकुलम (Kayamkulam) येथील मुस्लीम समाजाने पुढाकार घेत एका हिंदू मुलीचे अगदी रीतसर हिंदू पद्धतीने लग्न लावून दिले आहे. खास म्हणजे हा सोहळा याच जिल्ह्यतील 100 वर्षे जुन्या चेरावल्ली मशिदीत (Cheravalli Masjid) पार पडला, यावेळी या नव्या नवरीला सर्वांनी एकत्रितपणे 10 तोळे सोने भेट म्ह्णून दिले आहे .('रमजान'च्या महिन्यात रोजा मोडून मुस्लिम युवकाने मिळवले पुण्य, 85 वर्षीय हिंदू महिलेचे प्राण वाचवायला केले रक्तदान )
प्राप्त माहितीनुसार, अंजू नावाच्या या नववधूच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी ह्रदयविकाराने निधन झाले होते. त्यानंतर अंजु ही आपली आई बिंदू आणि तीन भावंडांसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न चार ठिकाणे कामे करून हे कुटुंब सोडवत होते, पण कधी ना कधी तरी मुलीचे लग्न करावेच लागेल आणि त्यावेळी खर्च कसा जुळवून आणायचा अशी चिंता मुलीच्या आईला लागली होती. अगदी शेवटी त्यांनी मशिदीत आपली अडचण सांगून आपल्यामुलीच्या लग्नसाठी मदत मागितली, जी विनंती लगेचच मेनी करून मशिदीच्या आपण खर्च उचलण्याची तयारी दाखलवली आणि लग्नाचा मुहूर्त ठरला.
मशिदीच्या वतीने पत्रिका छापून वाटण्यात आल्या, पाहुण्यांच्या जेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. यासोबत नवरीला दहा तोळे सोने आणि दोन लाख रुपये भेट म्हणून देण्यात आले या सर्वांसहित 19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांवर अंजुचे लग्न लावून देण्यात आले.
ANI ट्विट
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या लग्नाचे फोटो ट्विट करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पिनराई विजयन ट्विट
असं म्हणतात लग्न हा प्रेमाचा सोहळा आहे, या लग्नात खरोखरच दोन व्यक्ती, दोन कुटुंब आणि यासहितच दोन अगदी विरुद्ध मानल्या जाणाऱ्या समुदायांमधील प्रेमभावना प्रकर्षाने दिसून आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)