कलम 370 हटवल्यावर डोनाल्ड ट्रम्प सह आंतरराष्ट्रीय नेत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत काश्मिरी तरुणीचा खास व्हिडीओ, पाकिस्तानी मीडियाला सुद्धा टोला (Watch Video)
अशातच डोनाल्ड ट्रम्प सह आंतरराष्ट्रीय नेत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत काश्मिरी तरुणीचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने जम्मू काश्मीर (J&K) मधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेताच राजकीय व सामाजिक वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे, ठिकठिकाणहून नेते मंडळींच्या, कार्यकर्त्यांच्या, इतकेच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या देखील संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच एका काश्मिरी तरुणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याना मिरचंदानी (Yana Mirchandani) असे या तरुणीचे नाव असून तिने कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना तिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) , इस्त्राईलचे पंतप्रधान कार्यालय (Isarel PMO), संयुक्त राष्ट्र (UN), व चीनला सुद्धा टॅग केले आहे. या धाडसी निर्णयाला आंतरराष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती यानाने व्हिडिओतून केली आहे.
याना मिरचंदानी हिच्या व्हिडिओमध्ये तिने कलम 370 हा काश्मिरी युवकांच्या प्रगतीला घातक होता, यामुळे कित्येक वर्ष काश्मीर घाटीत बेरोजगारी सारख्या समस्या बळावल्या होत्या असे म्हंटले आहे. तसेच मागील काही दिवसात काश्मीर मधील सैन्याच्या कठोर पहाऱ्यामुळे आपल्याला कुटुंबाची भेट घेणेही शक्य नव्हते पण त्यानंतर आलेल्या या निर्णयामुळे आता काश्मीर बरेच सुरक्षित वाटत असल्याचेही यानाचे मत आहे.
याना मिरचंदानी पूर्ण व्हिडीओ
दरम्यान काश्मीर प्रश्नी घेतलेल्या निर्णयालावर साहजिकच पाकिस्तान कडून बरीच टीका झाली होती. याचा एक भाग म्हणजे एका पाकिस्तानी पत्रकार तरुणीने आपला निषेध नोंदवत एक व्हिडीओ शेअर केला होता. यानाने या तरुणीवर सुद्धा झोड घेत तिला ट्रोल केले आहे.
पाकिस्तान मीडियाला यानाचे उत्तर
5 ऑगस्ट रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दमदार भाषण करत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडला होता, यावर बहुमताने हा ठराव मंजूर झाला होता. हा आजवरचा सर्वात मोठा व ऐतिहासिक निर्णय असून त्याचे भारतीय जनतेने आनंदाने स्वागत केले होते.पण खरंतर या निर्णयनानंतर काश्मिरी तरुणांची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते म्ह्णून अवघ्या काहीच वेळात हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.