Jaipur WTP Viral Video: जयपूर वर्ल्ड ट्रेड पार्कबाहेर तरुणीचा राडा; नवीन व्हिडिओमध्ये गर्दीवर वीट फेकताना दिसली महिला

जयपूरमधील वर्ल्ड ट्रेड पार्क (WTP) आणि गौरव टावर परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका पर्यटकाने रस्त्यावर गोंधळ घातला असून, नवीन फुटेजमध्ये ती तिथे जमलेल्या गर्दीवर वीट फेकताना दिसत आहे.

Jaipur WTP Viral Video: जयपूर वर्ल्ड ट्रेड पार्कबाहेर तरुणीचा राडा; नवीन व्हिडिओमध्ये गर्दीवर वीट फेकताना दिसली महिला

राजस्थानची राजधानी जयपूरमधील मालवीय नगर येथील गौरव टावर आणि वर्ल्ड ट्रेड पार्क (WTP) परिसरातील एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्यावर भरचौकात मोठा गोंधळ घालताना आणि आरडाओरडा करताना दिसत आहे. या घटनेचे समोर आलेले नवीन फुटेज अधिक धक्कादायक असून, यामध्ये ती तरुणी तिथे जमलेल्या स्थानिक लोकांच्या गर्दीवर थेट वीट फेकून मारताना पाहायला मिळत आहे.

कॅब चालकाला मारहाण आणि वाहनाची तोडफोड

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही हिमाचल प्रदेशची रहिवासी असून ती आपल्या मित्रांसोबत जयपूर येथे पर्यटनासाठी आली होती. घटनेच्या दिवशी तिने अतिप्रमाणात मद्यप्राशन केले होते. ती हॉटेलमधून कॅब बुक करून फिरण्यासाठी निघाली होती, मात्र गौरव टावर परिसराजवळ पोहोचताच तिचा कॅब चालकासोबत वाद झाला. नशेत असलेल्या या तरुणीने कॅब चालकाला शिवीगाळ करत त्याची शर्ट फाडली आणि गाडीच्या काचा फोडल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या कॅब चालकाने परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून तिथून पळ काढला.

गर्दीवर फेकल्य विटा

कॅब चालक निघून गेल्यानंतरही या तरुणीचा राडा रस्त्यावर सुरूच होता. ती अर्धवट कपड्यांमध्ये रस्त्यावर आरडाओरडा करत होती. हा प्रकार पाहण्यासाठी आणि तिला शांत करण्यासाठी आजूबाजूला मोठी गर्दी जमा झाली होती. मात्र, समोर आलेल्या नवीन व्हिडिओनुसार, या तरुणीने रस्त्यावर पडलेली एक वीट उचलली आणि ती थेट समोर उभ्या असलेल्या गर्दीच्या दिशेने भिरकावली. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समजते.

भररस्त्यात सुरू असलेल्या या हायव्होल्टेज ड्राम्याची माहिती मिळताच जवाहर सर्कल आणि मालवीय नगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिला पोलिसांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि तरुणीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला उपचारासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी जयपूरिया रुग्णालयातील अपराजिता केंद्रात दाखल करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यानंतर या तरुणीने आपल्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे पोलिसांना सांगितले आणि वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून आणि तरुणीची समजूत काढून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून ती आपल्या गावी परतली आहे. सध्या पोलीस व्हायरल व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).