Danish Zehen च्या अकाली निधनानंतर त्याचं Instagram page ही बंद, चाहत्यांमध्ये नाराजी
Danish Zehen च्या निधनानंतर त्याचं Instagram page वरूनही त्याचं अस्तित्त्व नाहीस होणं हा त्याच्या चाहत्यांसाठी दुसरी वाईट बातमी आहे.
तरुणाईमध्ये प्रसिद्ध असणारा Danish Zehen चा काही दिवसांपूर्वी कार अपघातामध्ये अकाली मृत्यू झाला. 21 वर्षीय Danish Zehen लग्नाहून परतत असताना वाशी हाय वे जवळ त्याच्या गाडीला जबर अपघात झाला. जागीच मृत्युमुखी पावलेल्या या You Tuber हजारो फॅन्सच्या उपस्थितीमध्ये अंतिम निरोप देण्यात आला. सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध असणारा हा चेहरा एम टीव्हीच्या Ace of Space या कार्यक्रमाचा आणि Gillette चा ब्रँड अँबेसेडर होता. आता Danish Zehen चं इंस्टाग्राम पेज (Instagram page) देखील बंद करण्यात आलं आहे.
Danish Zehen च्या निधनानंतर त्याचं Instagram page वरूनही त्याचं अस्तित्त्व नाहीस होणं हा त्याच्या चाहत्यांसाठी दुसरी वाईट बातमी आहे. युट्युब प्रमाणेच इंस्टाग्रामवरही तो खूप प्रसिद्ध आणि ऍक्टिव्ह होता. त्याचं इंस्टाग्राम पेज बंद झाल्याचा निर्णय अनेक चाहत्यांना रुचलेला नाही. लोकप्रिय युट्यूबर Dansih Zehen चा रोड अपघातात मृत्यू; विकास गुप्ताने शेअर केली भावनिक पोस्ट
सारा अली खान, विकास गुप्ता असा सेलिब्रिटींपासून सामान्य चाहत्यांनी त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. अनेक ब्रँडसचा अँबेसेडर आहे. अवघ्या 21 व्या वर्षी इतकी लोकप्रियता मिळवणाऱ्या दानिशने त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहे. काही काळ त्याच युट्युब चॅनेल बंद करण्यात आलं होतं. त्यावेळेस तो नैराश्यात गेला होता.