Google 3D Animals: लॉक डाऊनमध्ये झालात बोअर? Tiger, Giant Panda, Lion यांच्यासह विविध प्राणी-पक्षांना 3D इफेक्टमध्ये भेटा तुमच्या घरात

याच संधीचा फायदा घेत गुगलने नवे फिचर लॉन्च केले आहे. यात विविध प्राणी, पक्षी त्यांना 3D इफ्केट देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या लोकांना एक छान सरप्राईज मिळाले आहे.

Google 3D Animals (Photo Credits: @AHS_Art, @DaliseSz Twitter)

सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटाचा सामना करीत आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकारने 21 दिवसांचे लॉक डाऊन घोषित केलें आहे. आज या लॉक डाऊनचा 10 वा दिवस, गेले दहा दिवस लोक आपापल्या घरात बंद आहेत. अशात साहजिकच हे दिवस कंटाळवाणे ठरत आहेत, खास करून लहान मुलांसाठी. या काळात तुम्हाला मुलांचे मनोरंजन करायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही हटके मार्ग सांगत आहोत. तर या लॉक डाऊनमधील कंटाळा दूर करण्यासाठी गुगलने एक भन्नाट कल्पना सादर केली आहे. गुगलचे 3 डी अ‍ॅनिमल्सचे (Google 3D Animals) फिचर वापरून तुम्ही वन्य प्राणी आणि पक्षांना आपल्या घरात बोलावू शकता. या 3D इफेक्टमध्ये मुलांच्या आवडीचे सिंह, वाघ, पेंग्विन, पांडा आणि कुत्रा यांसारखे प्राणी आहेत.

गुगलच्या 3D इफेक्ट फिचरमध्ये तुम्ही खालील प्राणी पाहू शकता- 1. वाघ (Tiger), 2. चित्ता (Cheetah), 3. शार (Shar), 4. हेजहोग (Hedgehog), 5. बदक (Duck), 6. पेंग्विन (Penguin), 7. लांडगा (Wolf), 8.आंग्लर फिश (Angler fish), 9. बकरी (Goat), 10. रॉटवेलर (Rottweiler), 11. साप (Snakes), 12. गरुड (Eagle), 13. अस्वल (Bear), 14. मगर (Alligator), 15. घोडा (Horse), 16. शेटलँड पोनी (Shetland pony), 17. मकाव (Macaw), 18. पग (Pug), 19. कासव (Turtle), 20. मांजर (Cat), 21. ऑक्टोपस (Octopus), 22. कुत्रा (Dog).

या फिचरचा वापर करण्यासाठी स्टेप्स:

जो प्राणी तुम्हाला 3D  मध्ये पाहायचा आहे तो गुगलवर सर्च करा. उदा. तुम्हाला चित्ता पाहायचा आहे तर तुम्ही चित्ता सर्च कराल. त्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिसेल त्यावर 'Meet a life-sized cheetah up close' असे लिहिले असेल.  मग 'view in 3D' या बटणावर क्लिक करा. त्यानंतर 'view in your space' असा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर हे फिचर अॅक्टीव्हेट होईल. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा अॅक्सेस गुगलला द्यावा लागेल. मग तुम्ही तो प्राणी मोबाईल मध्ये 3D इफेक्टमध्ये पाहू शकाल.

Giant Panda in 3D:

 

Giant Panda in Google 3D (Photo Credits: Google)

Lion View in 3D:

Lion in Google 3D Feature (Photo Credits: Google)

Tiger View in 3D:

Tiger in Google 3D feature (Photo Credits: Google)

गुगलने हे फिचर मागील वर्षी लॉन्च केले होते. परंतु, क्वारंटाइनच्या काळात हे फिचर अधिक लोकप्रिय होत आहे. गुगलचे हे फिचर वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अॅनरॉईड व्हर्जन 7.0 किंवा अपडेटेड असणे गरजेचे आहे. तुम्ही आयफोन युजर असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये iOS 11.0 किंवा अपडेटेड व्हर्जन असावे.