Geminid Meteor Shower 2018: आकाशात आज होणार उल्का वर्षाव, गुगलचे खास डुडल
त्यामुळे गुगलने त्यासाठी खास डुडल बनविले आहे. प्रत्येक वर्षी पृथ्वीजवळून दहा ते बारा उल्का जात असतात.
आकाशात आज उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे गुगलने (Google) त्यासाठी खास डुडल (Doodle) बनविले आहे. प्रत्येक वर्षी पृथ्वीजवळून दहा ते बारा उल्का जात असतात. मात्र त्यातील काही उल्का वगळता त्या धोकादायक नसतात. त्यामुळे आज आकाशात अद्भुत नजाराणा पाहायला मिळणार आहे.
अवकाशातून पृथ्वीवर येऊन खाली पडणाऱ्या घन पदार्थाला 'उल्का' असे म्हटले जाते. त्याचप्रणामाणे उल्का पडताना त्यांच्यामध्ये घर्षण निर्माण होऊन त्या चमकतात. तसेच उल्का जमिनीवर पडल्यास ती दगडासारखी दिसते म्हणून त्यांना 'उल्कापाषाण' किंवा 'अशनी' असे म्हटले जाते.
प्रत्येक वर्षी होणाऱ्या या उल्कांच्या वर्षावाचा सर्वजण उत्साहाने वाट पाहत असतात. तर आज मध्यरात्री उल्कांचा वर्षाव होताना दिसून येणार आहे. उल्कावर्षावाला 'जेनिनाड मीटियोर शॉवर'(Geminid Meteor Shower) असे संबोधले जाते. तर उल्कावर्षाव रात्री 9 वाजताच्या नंतर दिसणार आहे. मात्र हा वर्षाव पाहण्यासाठी टेलिस्कोप किंवा बहायोकुलरची गरज भासणार नाही.