Vande Bharat Express Flag-Off: वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवताच भाजपची आमदार रेल्वे रूळावर पडली, नेमकं काय घडलं? (Watch Video)
उत्तर प्रदेशातील इटावा येथे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असताना गर्दीमुळे भाजप आमदार सुरक्षा रेषेच्या ही पुढे गेल्या अन् वंदे भारत एक्सप्रेस हिरवा झेंडा दाखवताना रेल्वे रुळांवर पडल्या
Vande Bharat Express Flag-Off: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) त्यांचा ड्रीम प्रोजोक्ट वंदे भारत एक्सप्रेस सत्यात उतरवत सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा आणि वाराणसीदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर इटावा स्टेशनवर भाजप नेते वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी हजरे होते. हातात हिरवा झेंडा घेऊन नेते उभे असताना रेल्वे स्थानकावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. गर्दीमुळे भाजप आमदार या सुरक्षा रेषेच्या ही पुढे गेल्या. परिणामी एक जोरात धक्का मिळाला आणि भाजप आमदार सरळ रेल्वे रुळांवर पडल्या(BJP MLA Sarita Bhadauria Fell on Railway Track). त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सरिता भदौरिया असे या भाजप आमदाराचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील इटावा येथे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असताना ही घटना घडली. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना मदत करून वर काढले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्येच चढाओढ सुरू होती. यावेळी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये सरिता भदौरिया रेल्वे रुळावर पडल्या. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस इटावा स्टेशनवर आली असता ट्रेन पाहण्यासाठी स्टेशनवर मोठी गर्दी करण्यात आली होती. त्यामुळे ही घटना घडली.
भाजप आमदार सरळ रेल्वे रुळांवर पडल्या
दरम्यान, सरिता भदौरिया रेल्वे रुळावर पडल्यानंतर काही काळ गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित नेत्यांनी तात्काळ लोको पायलटला इशारा करून ट्रेन थांबवण्यास सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर सर्वांनी भाजप आमदाराला रुळावरून उचलले आणि ट्रेन पुढचया प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)